

Mumbai Local Train Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची देखभाल, अभियांत्रिकी व सिग्नल यंत्रणेची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे शनिवारी मध्यरात्री मुख्य मार्गावर विशेष ब्लॉक, तर रविवारी सकाळी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेणार आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द होणार असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.