
मुंबई : उपनगरी रेल्वेच्या देखभाल तसेच रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवार (ता. ५) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवर परळ ते भायखळादरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.