

मुंबई : उपनगरी रेल्वेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी रविवारी (ता. १६) मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान, हार्बर मार्गवरील वाशी ते पनवेलदरम्यान, तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.