

Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. ११) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्र अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.