

CCTV footage from Malad railway station showing the accused fleeing after the fatal stabbing incident during peak local train hours.
esakal
मुंबईच्या गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली. मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाच्या हत्ये प्रकरणी २७ वर्षीय ओंकार शिंदेला अटक करण्यात आली आहे. पीडित आलोक सिंग हे विलेपार्ले येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात प्राध्यापक होते. शनिवारी प्लॅटफॉर्म १ आणि २ वर घडलेल्या या घटनेने शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना धक्का बसला.