
Mumbai Local
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईत मंगळवारी मध्यरात्री धावत्या लोकलमध्ये घडलेला प्रसंग मानवी संवेदनाच नव्हे, तर रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरला. लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर प्रवासी विकास बेद्रे या तरुणाने आपत्कालीन साखळी ओढत लोकल थांबवली. राम मंदिर स्थानकात लोकल थांबल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विकासने परिस्थिती हाताळत डॉ. देविका देशमुख यांच्या व्हिडिओ कॉलवरील मार्गदर्शनाखाली महिलेची यशस्वी प्रसूती केली आणि बाळ आणि बाळंतिणीचे जीव वाचवले. ही घटना समाजमाध्यमांवर व्हायरल झाली; पण त्याच वेळी रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेची पोलखोल झाली.