

Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल तसेच अन्य अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी (ता. २६) मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेन लाईनवरील जलद लोकल सेवा धीम्या मार्गावर वळविण्यात येतील, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द राहणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसून, शनिवारी मध्यरात्री मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.