सरसकट लोकल सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक, उद्या आंदोलन करण्याचा इशारा

कुलदिप घायवट
Monday, 25 January 2021

गेल्या दहा महिन्यांपासून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला नाही आहे. मुंबईतील रहदारी, बाजारपेठा, मनोरंजन क्षेत्र सुरू झाली.

मुंबई: गेल्या दहा महिन्यांपासून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला नाही आहे. मुंबईतील रहदारी, बाजारपेठा, मनोरंजन क्षेत्र सुरू झाली. मात्र मुंबईची लाईफलाईन सरसकट सर्वांसाठी सुरू झाली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेकडून 26 जानेवारीला आंदोलन करण्यासाठी कंबर कसली आहे. 

राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या घोळात सामान्य प्रवासी कात्रीत सापडला आहे. दोन्ही बाजूने सामान्य प्रवासाची गळचेपी होत आहे. प्रवासी संघटना वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. फोनवर चर्चा करत आहेत. मात्र 'राज्य सरकारच्या परवानगीप्रमाणे लोकल सुरू होईल. लोकल सुरू करण्यासाठी सज्ज आहोत', असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. 

लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची ठाम भूमिका घेत नसल्याचा आरोप प्रवासी संघटना करत आहेत. त्यामुळे 26 जानेवारीला रेल्वे मुख्यालयात आंदोलन करण्याची भूमिका रेल्वे प्रवासी संघटनांनी घेतली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकल सेवा बंद ठेवून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचा संशय आहे. आधीच आर्थिक गर्तेत पिचलेल्या नागरिकांना खासगीकरणामुळे आणखीन त्रास होईल. त्यामुळे सर्व प्रवासी एकत्र येऊन सरसकट लोकल सुरू करण्याचे म्हणणे आंदोलनाद्वारे रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहे. आज रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक ठेवण्यात आली असल्याचं महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत यांनी सांगितले.

हेही वाचा- Mumbai Police: मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट

फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन बाजारात बस, रिक्षा, टॅक्सी यामध्ये होताना दिसून येत नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि काही क्षेत्रातील प्रवासी वर्गासाठी लोकल सेवा सुरू आहे. मात्र तरीही लोकलमध्ये पीक अव्हरच्यावेळी फिजिकल डिस्टन्स राहत नाही. त्यामुळे सरसकट लोकल सुरू करण्यात येण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai Local train waiting to start Travelers organizations aggressive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai Local train waiting to start Travelers organizations aggressive