त्यानंतरच मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ: पियुष गोयल

पूजा विचारे
Sunday, 4 October 2020

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईत लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अद्याप कोणतीही मागणी आली नसल्याचं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशात मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. सध्या लोकलची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतल्या नागरिकांसह विरोधी पक्षाकडून मुंबईत पुन्हा लोकल सुरु करण्याची मागणी केली जात आहे. आता मुंबई लोकल सुरु करण्याबाबत  रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

मुंबईत लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अद्याप कोणतीही मागणी आली नसल्याचं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्य सरकारच्या मागणीनंतरच मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मुंबई लोकल रुळावर कधी येईल याबाबत अजूनही स्पष्टता मिळालेली नाही आहे. 

अधिक वाचाः  चौपाटीवर सुप्रिया सुळेंचा कोरोना योद्धांसोबत सेल्फी, व्यक्त केली कृतज्ञता

राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला मुंबई लोकल सुरु करण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे आमच्याकडे प्रस्तावच आला नाही तर मुंबई लोकल पुन्हा सुरु करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्यावेळी राज्य सरकार आमच्याकडे प्रस्ताव पाठवेल त्यावेळी आम्ही त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचाः नेस्को कोविड सेंटरमधील अस्थायी कर्मचारी गेले 3 महिने वेतन विना

गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन आणि लॉकडाऊन जाहीर केल्यापासून लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर जुन- जुलै महिन्याच्या दरम्यान अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. अजूनही सामान्य नागरिकांना रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा नाही आहे.

Mumbai local train Will start after state government sends the proposal railway minister Piyush Goyal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai local train Will start after state government sends the proposal railway minister Piyush Goyal