
Mumbai Local Train: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत असून, त्यांचा राग इतका अनावर झाला होता की, एकमेकींचे डोके फुटेपर्यंत त्या रक्तबंबाळ होऊन मारामारी करत होत्या. हा सर्व प्रकार उपस्थितांपैकी एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला असून, तो आता सर्वत्र व्हायरल झाला आहे.