Mumbai Local: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर अपघाताच्या घटना, ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; प्रवाशांचे हाल

Mumbai Local Train Delay: मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर अपघातांच्या घटना घडल्याचे समोर आले. परिणामी प्रवाशांना विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.
Mumbai Local Train

Mumbai Local Train

esakal

Updated on: 

मुंबई : उपनगरी रेल्वे सेवेतील अडथळ्यांचे सत्र गुरुवारीही सुरूच राहिले. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे-माहीमदरम्यान रुळालगत साचलेल्या कचऱ्याला आग लागली, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर खडकी-इंदूर विशेष एक्स्प्रेसची आपत्कालीन साखळी ओढण्यात आली, तर हार्बर मार्गावर स्वयंचलित इशारा प्रणाली सक्रिय झाल्याने पनवेल लोकल थांबवावी लागली. एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

Loading content, please wait...