esakal | Mumbai Local Trains Megablock | रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Trains Megablock | रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे मार्गाची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी रविवारी, 27 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mumbai Local Trains Megablock | रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई  : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे मार्गाची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी रविवारी, 27 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दाेन्ही मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत दुरुस्ती केली जाणार आहे. परिणामी पनवेल ते वाशी, बेलापूर / नेरुळ ते खारकोपर वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या साेयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लाेकल चालविण्यात येतील.ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी रेल्वे वाहतूक सुरु राहील.

ब्रिटनवरून आलेली एका 29 वर्षीय तरुणी पॉझिटिव्ह; नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

पश्चिम रेल्वेवर रविवारी बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.तसेच अप आणि डाउन मार्गावरील काही लाेकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Local Trains Megablock on Central, West and Harbor Way on Sunday

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image