भारत बंदमुळे मुंबईची लाईफ लाईन विस्कळीत, ट्रेन प्रवाशांनो बातमी वाचा

भारत बंदमुळे मुंबईची लाईफ लाईन विस्कळीत, ट्रेन प्रवाशांनो बातमी वाचा

मुंबई - देशभरात CAA आणि NRC वरून मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारत बंदची हाक देण्यात आलीये. याचा मोठा फटका मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसलाय. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाकरमानी लोकलने प्रवास करत असतात. अशात आज सकाळीच कांजूरमार्ग स्टेशनवर स्लो ट्रॅकवर रेल रोको केलं गेलं. रेल रोकोमुळे सकाळी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. सकाळी वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचणाऱ्या  चाकरमान्यांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागतोय. दरम्यान या रेल रोकोमुळे अजूनही रेल्वे प्रवाशांना फटका बसतोय. 

आंदोलकांनी कांजूरमार्ग स्टेशनवर स्लो ट्रॅकवरील लोकलची वाहतूक अडवली आणि त्यामुळेच सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतोय. दरम्यान, आंदोलकांना तात्काळ ट्रॅकवरून हटवण्यात आलं असलं तरीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. त्यामुळे तुम्ही जर आज लोकने प्रवास करणार असाल तर वेळेवर पोहोचाल याची शाश्वती नाही.  

बहुजन क्रांती मोर्चाने आज, भारत बंदची हाक दिली. या बंदला मुंबईततरी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान,  कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवरील छोट्याशा आंदोलनाचा मोठा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. 

mumbai local updates central railways disturbed after rail roko at kanjurmarg station due to bharat bandh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com