esakal | मुलुंड-ठाणेदरम्यान रेल्वे रूळाला तडा; लोकल काही काळ खोळंबली
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai local

मुलुंड-ठाणेदरम्यान रेल्वे रूळाला तडा; लोकल काही काळ खोळंबली

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: मुलुंड आणि ठाणे या स्टेशन्स दरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आणि लोकलचा खोळंबा झाला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर रेल्वे रूळावरून चालत पुढील स्टेशन किंवा जवळचा रस्ता गाठण्याची वेळ ओढवली होती. पण काही वेळात रेल्वे रूळाची दुरूस्ती करण्यात आली आणि लोकल सेवा धीम्या गतीने पूर्ववत होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सकाळी ९ वाजून २५ मिनिटांच्या आसपास रेल्वे रूळाला तडा गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ९.५० ला रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रूळाची दुरूस्ती केली, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. (Mumbai Local Updates Railway Track crack between mulund thane stations)

याशिवाय, पावसामुळे बुधवारी रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पण शुक्रवारी मात्र पावसाचा जोर कमी असल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली नाही. सकाळी जोरदार पाऊस पडला त्यावेळी काही काळासाठी सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यामुळे अंधेरी सबवे आणि इतर रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र होते. पण पावसाने बराच काळ उसंत घेतल्याने सारं सुरळीत झालं. सध्या रेल्वे वाहतुकही विनाअडथळा सुरू असल्याचे मध्ये रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.