
Maharashtra News: नवीन विस्तारित ठाणे स्थानकाच्या मार्गातील अडथळ्यांची मालिका सुरूच आहे. आता या स्थानकाच्या कामात वागळे ते कोपरी पूर्वपर्यंत जाणाऱ्या उच्च दाब विद्युतवाहिनीची समस्या उद्भवली आहे. वास्तविक ही वाहिनी हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १० वर्षांपूर्वीच महावितरणकडे पाठपुरावा केल्याचा दावा होत आहे.
दरम्यान, रेल्वे रुळाखालून वाहिन्या टाकण्याचे कामही काही अंशी झाले होते; मात्र तेही अर्थवट अवस्थेत असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आता विस्तारित ठाणे स्थानकाच्या कामाला गती देण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुढाकार घेतला आहे. महिनाभरात यावर तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.