खुशखबर! दादर- मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचं पालटणार रुपडं

10 जूनपासून दादरऐवजी सीएसएमटीवरून सुटणार जनशताब्दी एक्सप्रेस
खुशखबर! दादर- मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचं पालटणार रुपडं
Updated on

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला नवीन झळाळी मिळणार आहे. त्यामुळे आता कोकणवासियांचा प्रवास अधिकच सुखकर आणि आरामदायी होणार आहे. येत्या १० जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. तसंच दादारऐवजी आता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणार आहे. (mumbai-madgaon-janshatabdi-special-train-look-change)

नव्या गाडीमध्ये डब्यांची लांबी व रुंदी वाढवण्यात आली असून गाडीचे दरवाजे मोठे करण्यात आले आहेत. तसंच सुधारित रचनेत बेसीन आणि शौचालयेदेखील बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यातच गाडीचा वेगही वाढला आहे.नव्या प्रकारातील लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) जनशताब्दी एक्सप्रेसलालावले जाणार आहे. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसला निळ्याऐवजी लाल-करडा असा नवा रंग मिळणार आहे. कोकणवासियांना नव्या स्वरूपातील जनशताब्दी एक्सप्रेसचा अनुभव घेता येणार आहे. तर, त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना यांच्या लाभ होणार आहे.

गाडी क्रमांक 01151/01152 दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वे आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्यातील मडगाव शहरासोबत जोडते. रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या या एलएचबी कोच लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला १० जूनपासून एलएचबी कोच आणि प्रवाशांना निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी एक विस्टाडोम कोच लावण्यात येणार आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला चेअर कार 3 डबे, दृतीय श्रेणी 10,  जनरल कोच 1, एसएलआर कोच 1 आणि विस्टाडोम कोच 1 असे एकूण 16 डब्याची एक्सप्रेस असणार आहे. या एलएचबी डब्यामुळे एखादा अपघात झाल्यास जिवीतहानी कमी होते, तसेच गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

नव्या वेळापत्रकासह दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी आता सीएसएमटी रेल्वे स्थानकांवरून सुटणार आहे. 10 जूनपासून पहाटे सीएसएमटीवरून 5 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. तर, दादर टर्मिनसवर 5 वाजून 18 मिनिटांनी पोहचणार आहे. तसेच मुंबईकडे येणारी दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी दादरला रात्री 11 वाजून 8 मिनिटांनी पोहचणार आहे. तर, सीएसएमटी स्थानकांवर रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com