मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवार, (ता.21) रोजी विविध अभियांत्रिकी कामे, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मध्य मार्गिका आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

कुठे : ठाणे -कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी : सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर या सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा: Live : प्रसंग आला तर शिवसेना-भाजप एकत्र येतील - दानवे

कुठे : कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.

हेही वाचा: अमरावती बंद : तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; पोलिस आयुक्तांचा निर्णय

कुठे : सांताक्रूझ ते माहीम दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते माहीम दरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावर चालविण्यात येईल. तर, काही लोकल सेवा रद्द केल्या जातील.

loading image
go to top