esakal | मुंबईत डासांचा फैलाव रोखण्यासाठी BMC कडून उपाययोजनांंचा आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

mayor kishori pednekar

मुंबईत डासांचा फैलाव रोखण्यासाठी BMC कडून उपाययोजनांंचा आढावा

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मलेरीया (malaria patient) आणि डेंगीचे रुग्ण वाढू लागल्यावर महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) स्वत: मैदानात उतरल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) काही भागातील बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन डास प्रतिबंधाबाबत (mosquitoes prevention) सुरु असलेल्या उपायांचा आढावा (bmc management) घेण्यात आला. यावेळी बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचू नये तसेच साचलेल्या पाण्यात डास होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

हेही वाचा: जिम मध्ये 'सप्लिमेंट'चा गोरख धंदा; अन्न व औषध प्रशासन उगारणार कारवाईचा बडगा

कोविड थंडावलेला असताना मलेरीया डेंगीचे रुग्ण वाढू लागले आहेत.या पार्श्‍वभुमीवर महापौरांनी शुक्रवारी बैठक घेतली.त्यानंतर आज स्वत: मैदानात उतरल्या. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या परीसरात पाणी साचल्याने त्यात डासांची पैदास होत असल्याचे वेळोवेळी आढळले आहेत.नव्याने बांधण्यात आलेल्या स्लॅबवर ठराविक दिवस पाणी ठेवावे लागते.त्यामुळे यात डासांची पैदास होण्याची भिती आहे.या पाण्यात जंतूनाशक टाकणे विकसकांना बंधनकारक आहे.मात्र,काही ठिकाणी ही काळजी घेतली जात नसल्याचे वेळोवेळी आढळले आहे.महापौरांनी आज शिव आणि माटूंगा परीसरात बांधकाम सुरु असलेल्या परीसरांचा आढावा घेतला.तसेच,संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्‍यक प्रतिबंधक उपाय करण्याच्या सुचनाही महापौरांनी दिल्या आहेत.

loading image
go to top