esakal | जिम मध्ये 'सप्लिमेंट'चा गोरख धंदा; अन्न व औषध प्रशासन उगारणार कारवाईचा बडगा
sakal

बोलून बातमी शोधा

 supplements

जिम मध्ये 'सप्लिमेंट'चा गोरख धंदा; अन्न व औषध प्रशासन उगारणार कारवाईचा बडगा

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : उच्छभ्रू वस्तीमधील जिम मध्ये (GYM) प्रोटीन पावडर (Proteins Supplements) तसेच स्टेरॉईड (Steroids) हे 'सेप्लिमेंट' औषध दिले जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय (Doctors advice) हे औषध घेतल्यास आरोग्यास गंभीर धोका (injurious to health) निर्माण होऊ शकतो असे डॉक्टर सांगतात. अन्न व औषध प्रशासनाकडून (food and medicine department) याची दखल घेण्यात आली असून लवकरच कारवाईस सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: मुंबईतील चौपाट्यांचा होणार कायापालट ? रेती बंदरावर उद्यानाचे आकर्षण

अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी जिम मधील व्यक्तींचे अचानक होणाऱ्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. व्यायामादरम्यान घेण्यात येणाऱ्या उत्तेजन औषधांच्या परिणामांमुळे मृत्यू ओढावत असल्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेमुळे जिम मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देण्यात येणाऱ्या औषधांच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मुंबईतील अंधेरी, जुहू , विलेपार्ले, वांद्रे,गोरेगांव आणि मलाड मधील जिम मध्ये अवैध प्रोटीन पावडर तसेच स्टेरॉइड दिले जात असल्याचा आरोप ऑल फूड्स अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. या परिसरतील जिमचे सिनेमा तसेच टीव्ही वरील अनेक कलाकार सदस्य आहेत. त्यांना कमी वेळात अधिक शरीरयष्टी बनवायची असते. त्यासाठी त्यांना ट्रेनर प्रोटीन पावडर तसेच स्टेरॉइड देतात असेही पांडे यांनी सांगितले.

हेही वाचा: डोंबिवलीत खड्ड्यांची समस्या जैसे थे; मनसेचे पुन्हा आंदोलन

बहुतांश जिम मध्ये डॉक्टर किंवा डाएटीशीयन्सची नेमणूक देखील नाही. अशा जिम मध्ये अवैधरित्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची विक्री होत असल्याची तक्रार पांडे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. जिम मधील ट्रेनर अशी औषध देत असतील तर ते चुकीचे असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष जयेश लेले यांनी सांगितले. जिम मधील ट्रेनर हे डॉक्टर नाहीत त्यामुळे त्यांनी औषध देणे चुकीचे ठरू शकते,यामुळे एखाद्याचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती ही लेले यांनी व्यक्त केली.

"जिम मध्ये अवैध प्रोटीन पावडर आणि स्टेरॉइड दिल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेकदा जिम मध्ये अशा प्रकारची औषध सापडत नाहीत मात्र ट्रेनर कडून ही औषध दिली जातात. या विरोधात मोहीम आखून लवकरच धडक कारवाई सुरू केली जाईल."

-डॉ.डी आर गहने , सहाय्यक आयुक्त , अन्न व औषध प्रशासन.

loading image
go to top