esakal | 'मुंबईचा अन्नदाता'; दररोज १०० नागरिकांना देतायेत मोफत जेवण

बोलून बातमी शोधा

'मुंबईचा अन्नदाता'; दररोज १०० नागरिकांना देतायेत मोफत जेवण

'मुंबईचा अन्नदाता'; दररोज १०० नागरिकांना देतायेत मोफत जेवण

sakal_logo
By
तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने अनेक नागरिक स्वतःच्या घरात क्वारंटाईन होण्यास प्राधान्य देत आहेत. अशा रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी भालचंद्र जाधव (mumbai man)अन्नदाता बनले आहेत. होम क्वारंटाईन रुग्णांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांनी मोफत जेवणाची (free food) व्यवस्था केली असून दिवसाला सुमारे 100 रुग्णांना (100 home isolated covid patients) ते दोन वेळचे घरपोच जेवण पोचवत आहेत. (mumbai man arranges food for 100 home isolated covid patients)

कोरोना बाधित (covid patients)जाहीर होताच नातेवाईक, आजूबाजूचे रहिवाशी रुग्णापासून दूर जातात. त्यांना संकटकाळी कोणतेही सहकार्य करत नाहीत. होम क्वारंटाईन रुग्णांना तर कोणी साधे पाणी देण्यास कोणी तयार होत नाही. मात्र काही लोक संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. अशांपैकीच एक आहेत, भालचंद्र जाधव. ते केटरिंगचा व्यवसाय करतात.

होम क्वारंटाईन रुग्णांना घरपोच जेवण पुरविण्याची माहिती जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवली. त्यानुसार गेल्या 15 दिवसांपासून ते परळ, शिवडी, वडाळा या भागात मोफत जेवणाचे डबे पोहोचवत आहेत. गेल्या वर्षीच्या आणि आताच्या लॉकडाउनमुळे व्यवसायात तोटा झालेला असताना त्यांनी हे काम हाती घेतले आहे. त्यांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहचू लागल्याने त्यांच्याकडे जेवणाची मागणी करणारे फोन दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

हेही वाचा: दम्याचा त्रास आहे?; आहारात घ्या 'हे' चार पदार्थ

सुरुवातीला या उपक्रमाला कमी प्रतिसाद होता. परंतु, आता आम्हाला विविध भागातून मदतीसाठी फोन येऊ लागले आहेत. सध्या सुमारे 100 जणांना ही सुविधा पुरविण्यात येत आहे. हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी होम डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी केटरिंग व्यवसायात काम करणाऱ्या मुलांना सोबत घेतले आहे. तसेच कुटुंबातील सर्वजण मदत करत आहेत.

"होम क्वारंटाईन रुग्णांना कोणी मदत करण्यास पुढे येत नाही. त्यांना पोटभर जेवणाची आवश्यकता असते. गरजूला मदत करता येत असल्याचे समाधान आहे. लोक डबा मिळाल्यानंतर हात जोडतात, ते पाहून डोळ्यात पाणी येते. इतर लोकांनी सुद्धा आपल्यापरीने मदत करायला हवी", असे भालचंद्र जाधव यांनी सांगितले.

संपादन : शर्वरी जोशी