
दुकाने उघडली, पण प्रामुख्याने ग्राहंकाची प्रतिक्षा
मुंबई ः भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दुकाने शुक्रवारपासून ऊघडली खरी, पण अजूनही अनेक दुकानदारांची ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर प्रतिक्षा सुरु आहे. अर्थात ग्राहकांचा कल गरजेच्या वस्तू खरेदीसाठी जास्त असल्याने पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंच्या दुकानात चांगली गर्दी दिसत होती.
मुंबईत जवळपास तीन लाख दुकाने आहेत, त्यात पूर्ण ताकदीने कामही सुरु झाले नाही. अनेक दुकानातील कर्मचारी उपनगरात राहतात. उपनगरी रेल्वे बंद असल्यामुळे पुरेसे कर्मचारीही दुकानात नाहीत. त्यातच काही दुकानातील कामगार थेट गावालाच गेले आहेत. त्यामुळे सर्वच दुकाने उघडलीही नव्हती असेही सांगितले जात आहे.
काळबादेवी परिसरातील कापड बाजार खुला झाला नाही. तेथील दुकानात जास्त अंतर असल्याने त्या ठिकाणी दुकाने खुली करण्यास परवानगी दिली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, एमजे मार्केटमधील अनेक दुकाने बंद होती.
एकंदरीत विचार केल्यास ग्राहकांनी सुरुवातीस गर्दी करणार नाहीत असाच अंदाज व्यक्त होत आहे. मद्यविक्री सुरु झाल्यावर झालेली गर्दी पाहून हा निर्णय अनेकांनी घेतला असेल. त्याचबरोबर अजूनही सम विषमबाबत काही दुकानदारांचा गोंधळ असल्यानेही ऊघडली नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर काही दुकानदार गावीही गेले आहेत, तर काही दुकानदारांनी पहिला दिवस दुकानाच्या स्वच्छतेसाठी राखून ठेवला होता.
उपनगरात दुकानात जास्त गर्दी नव्हती, पण मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आली. वाहन दुरुस्तीच्या दुकानात चांगलीच गर्दी होती.
दुकानदारांना आता अडीच महिने दुकानात पडून राहिलेला माल कसा विकता येईल याची चिंता आहे. जोपर्यंत हा माल विकला जात नाही, तोपर्यंत नवा माल खरेदीही करणार नाही, असे ते सांगतात. ग्राहकांपैकी अनेकांनी सुरुवातीस मार्केटचा आढावा घेणार आहोत, त्यानंतरच खरेदीचा विचार करणार आहोत. खूप दिवसांनी दुकाने ऊघडली आहेत, त्यामुळे त्यात गर्दी असेल असाही विचार अनेकांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.