
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज पाचवा दिवस उजाडला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातील मराठा समाजाने पाठिंबा देत मोठ्या संख्येने मुंबईत गर्दी केली आहे. मात्र, या आंदोलनात बाहेरील व्यक्ती घुसल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. काल मुंबई हायकोर्टानेही या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त करत आंदोलन हाताबाहेर गेल्याचे निरीक्षण नोंदवले. आज मध्यप्रदेशातील एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आल्याने आंदोलनात तणाव निर्माण झाला आहे.