Patanjali coronil | पतंजलीचे थेट IMA संघटनेला खुले आवाहन

भाग्यश्री भुवड
Thursday, 25 February 2021

पतंजली निर्मित कोरोनील औषधाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असल्याचे सांगितल्याने आय एम ए संघटनेने आश्चर्य व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले होते

मुंबई : पतंजली निर्मित कोरोनील औषधाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असल्याचे सांगितल्याने आय एम ए संघटनेने आश्चर्य व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले होते. यावर पतंजलीने इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेला खुले आवाहन केले असून निमुटपणे आरोप मागे घ्या असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनीलच्या खरेपणाचा दावा पतंजली कडून खुल्या पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहे. 

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, या बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय चिटणीस डॉ जयेश लेले यांना विचारले असता ते म्हणाले कि, कोरोनील बाबत केलेल्या ट्रायलचे कागदोपत्र पतंजलीने सादर करावेत एवढीच आमची मागणी आहे. बाकी त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची मागणी केलेली नाही. विज्ञान निष्ठ पुरावे पतंजलीने सादर करावेत. तसेही आम्ही आमच्या माहिती अधिकारातून माहिती मागवली आहे, असेही डॉ. लेले म्हणाले. दरम्यान, पतंजलीकडून ही सडेतोड उत्तर देण्यात येणार असल्याचे सध्याच्या वातावरणावरून स्पष्ट होत आहे. यात आय एम ने केलेले अवैज्ञानिक आरोप खोडून काढण्यात येतील असेच एकूण चित्र दिसत आहे.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai marathi latest news Patanjali coronil open appeal directly IMA organization live update


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi latest news Patanjali coronil open appeal directly IMA organization live update