
डोंबिवली: कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद उफाळून आला आहे. डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथील एका सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोसायटीच्या व्हॉट्स अप ग्रुपवर चर्चा सुरु असताना सोसायटीमधील अमराठी भाषिकांनी कार्यक्रमाला विरोध दर्शविला.