esakal | मुंबई : मास्क बंधनकारक तरीही रोज २२५ जणांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : मास्क बंधनकारक तरीही रोज २२५ जणांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करुन वर्ष पुर्ण झाले आहे.पण,आजही रोज 225 ते 250 हून अधिक नागरीकांवर मास्क न वापरल्या बद्दल कारवाई केली जात आहे. संपुर्ण मुंबईत आज पर्यंत 33 लाख 19 हजार 587 जणांवर कारवाई झालू असून त्यातून पालिकेने 66 कोटी 78 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.

कोविडच्या पाश्‍र्वभुमीवर एप्रिल २०२० पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले.मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपयांचा दंड वसुल केला जात आहे.वर्षापेक्षा अधिक काळापासून ही कारवाई सुरु आहे.मात्र,आजही मुंबईतील रस्त्यावर मास्क न लावता फिरणारे,मास्क नाकाखाली घेऊन तसेच मास्क गळ्यात लटकवून वावरण्याची संख्या कमी झालेली नाही.

हेही वाचा: जिम औषध विक्री प्रकरण : 'एफडीए'चा 'स्पेशल ड्राइव्ह'

महानगर पालिकेने आता पर्यंत सार्वजनिक ठिकाणी 28 लाख 7 हजार जणांवर कारवाई केली आहे.त्यांच्याकडून 56 कोटी 51 लाख 39 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.रोज साधारण 44 लाखांचा दंड वसुल केला जात आहे.तर,रेल्वेच्या हद्दीतही अशीच कारवाई सुरु करण्यात आली आहे.प्रवाशांकडून आता पर्यंत 50 लाख 39 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून 23 हजार जणांवर कारवाई करण्यात आले आहे.

पिचकारी बहाद्दर कमी ?

मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.मात्र,सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे अवघे तीन ते चार जणांवर कारवाई केली जात आहे.आता पर्यंत 27 हजार 798 जणांवर कारवाई करण्यात आली असून 55 लाख 48 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.महानगर पालिका सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून 200 रुपयांचा दंड वसुल करते.न्यायालयाने तब्बल 1200 रुपयांचा दंड वसुल करण्याचे निर्देश महानगर पालिकेला केले आहे.ही दंडाची रक्कम वाढविण्यासाठी महानगर पालिकेने प्रशासकीय प्रक्रिया सुरु केली आहे

loading image
go to top