esakal | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रूग्णालयात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रूग्णालयात दाखल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रूग्णालयात दाखल

sakal_logo
By
विराज भागवत

महापौर कार्यालायतून देण्यात आली महत्त्वाची माहिती

मुंबई: कोरोनाकाळात अतिशय अ‍ॅक्टीव्ह असलेल्या आणि विविध विषयांमुळे सदैव चर्चेत असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना लगेचच मुंबईतील एका रूग्णालायत दाखल करण्यात आले. महापौर कार्यालायतून ही माहिती देण्यात आली. (Mumbai Mayor Kishori Pednekar has been admitted due to chest pain in a hospital says BMC Mayor Office)

दरम्यान, मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये (Chembur Wall Collapsed) भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. तर विक्रोळीमध्ये (Vikhroli House Collapsed) एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील या घटनांमध्ये तब्बल 21 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया (Reaction) दिली. "घडलेल्या घटना दुर्देवी आहेत. मी याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नव्हते. महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते, त्यावेळी त्याला विरोध केला जातो. चेंबूरमधील घटनेचीही माहिती घेतली. त्यातही असंच झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेथील नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगितलं होतं. तुमची घरं दरडीच्या खाली आहेत पण ते लोक ऐकत नव्हते", अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळी दिली होती.

loading image