'माझ्या दादाकडे बघशील तर...' महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

Kishori-Pednekar
Kishori-Pednekarsakal media

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. तसेच संबंधित पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौरांना(mumbai mayor) शिवीगाळही झाली आहे.

माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगुन अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आलं आहे. या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मागील तीन दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांच्याभोवती काँट्रोव्हर्सी सुरू आहे. भाजपचे आमदार अशिष शेलार (MLA ashish shelar) यांनी पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणात त्यांना अटक होणार असल्याची बातमी येत असतानाच ऑन टेबल जामीन मंजूर करण्यात आला.

यासाठी त्यांनी काल मरिन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये (Marine Lines Police Station) हजेरीही लावली. त्यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. या घटनेची धुराळा खाली बसण्याधीच पेडणेकरांना धमकीचं पत्र गेलंय. त्यामुळे आणखी राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वाढली आहे.

थोड्याच वेळात महापौर करणार तक्रार

या धमकीविरोधात महापौर किशोरी पेडणेकर थोड्याच वेळात पोलीस तक्रार देणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबईच्या महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुस-यांदा धमकी देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com