त्यावर भाजपाकडे उत्तर नाही - किशोरी पेडणेकर

वरिष्ठ नेत्याने सांगितलं, की भाजपाचे नगरसेवक आंदोलनाला उभे राहतात.
किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर File photo
Updated on

मुंबई: "भाजपा (bjp protest)कुठलाही अभ्यास करत नाही. वरिष्ठ नेत्याने सांगितलं, की भाजपाचे नगरसेवक आंदोलनाला उभे राहतात. भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी कल्पना दिली असती, तर मी महापौर दालनात उपस्थित राहिली असती, निवेदन घेतल असतं. रुग्णांना मोफत लस द्या, अशी त्यांची मागणी होती. आपण महापालिकेच्या, राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये लस मोफत देतोय" असे मुंबईच्या महापौर (Mumbai mayor)किशोरी पेडणेकर (kishori pednekar)म्हणाल्या. (Mumbai mayor kishori pednekar slam bjp over protest)

"खासगी रुग्णालय जी लस विकत घेतात. त्या विकत घेतलेल्या लसीचे १५० रुपये केंद्राला जातात. १०० रुपये व्यवस्थेसाठी आहेत. ते १५० रुपये घेऊ नका म्हणून सांगा. आपण सगळे नगरसेवक मिळून जाऊ. भाजपाच्या नगरेसवकांसोबत मी येते. आपण तिथे आठवडाभर धरण आंदोलन करु" असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर
मुंबईत 'या' केंद्रांवर ४५ वर्षावरील व्यक्तींचे सुरु आहे लसीकरण

"सुप्रीम कोर्टाने महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलय. वाभाडे काढलेले नाहीत. ज्यावेळी चुकतं त्यावेळी सुप्रीम कोर्ट आपलं म्हणणं सांगतं असतं, कोर्ट देशाला दिशा देतं. आज मुंबई, महाराष्ट्र सरकारला गौरवित करण्यात आलं, त्यावर भाजपाकडे उत्तर नाहीय" असे महापौर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर
अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी लागणारे युरेनियम जप्त

"उद्धव ठाकरेंवर सर्वबाजूंनी टीका होत होती. पण कुठेही मुख्यमंत्री विचलित झाले नाहीत. संयम सोडला नाही. जनतेला मी मृत्यूच्या दारात जाऊ देणार नाही. जे शक्य आहे, ते सर्व करणार याकडेच त्यांनी सर्व लक्ष केंद्रीत केलं होतं" असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. "मुंबईने चांगलं काम केलय. त्याचा धडा घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितले. देशाची राजधानी दिल्लीत तीन महापालिका भाजपाकडे आहेत. पण महाराष्ट्रातील सत्तेला कस हलवता येईल, हे पाहतात. काम चांगलं चाललेल असताना गळे काढतात" अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com