esakal | Mumbai: पंधरावड्यात खड्डे भरणार- महापौर
sakal

बोलून बातमी शोधा

किशोरी पेडणेकर

मुंबई : पंधरावड्यात खड्डे भरणार- महापौर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कार्यालयात बसून काम करु नका तर रस्त्यावर उतरून काम करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे. येत्या 15 दिवसात खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने पुर्ण होऊन नागरीकांना दिलासा मिळेल.असा विश्‍वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांवरुन सध्या चांगलेच राजकरण पेटले आहे.महानगर पालिकेने 900 च्या आसापास खड्डे दुरुस्त करण्यासाठी 48 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.असा आरोप भाजपने केला आहे.त्यावर ,,,प्रिल महिन्या पासून आता पर्यंत 42 हजार खड्यांची दुरुस्ती करण्यात आली असल्याचा दावा महापौरांनी केला.तसेच,स्वत: प्रत्यक्ष पाहाणी करुन सत्य परीस्थीतीती अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे.रस्त्यांच्या दर्जाशी कोणतीही तडजोड होणार नसून खड्डे दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर करण्यात येईल असेही महापौरांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: बलात्कार प्रकरण : 21 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

महासभेसह सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाईन होत आहे.या बैठका प्रत्यक्ष घेण्यासाठी भाजपने आंदोलन सुरु केले आहे.या बैठका प्रत्यक्ष घेण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.प्रशासनालाही याबाबत तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे महापौरांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top