आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल वेळापत्रक

कुलदीप घायवट
Sunday, 20 December 2020

मध्य, पश्चिम आणि हार्बर  रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी म्हणजेच आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.

मुंबई:  मध्य, पश्चिम आणि हार्बर  रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी म्हणजेच आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी 10.50 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येईल.

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील रेल्वे मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी  4.05 वाजेपर्यंत दुरुस्ती केली जाणार आहे. परिणामी पनवेल ते वाशी, बेलापूर / नेरुळ ते खारकोपर वाहतूक बंद राहिल. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी वाहतूक सुरु राहिल. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पश्चिम रेल्वेलाही मेगा ब्लॉकचा फटका

पश्चिम रेल्वेवर आज सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येतील. तसेच दोन्ही दिशेकडील मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यात.

हेही वाचा- अकरावी विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर; 75 हजारहून अधिक विद्यार्थी प्रवेशाविना

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai mega block today Central and Western Railway zone Check timings


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai mega block today Central and Western Railway zone Check timings