Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण
मेट्रो-३ प्रकल्पासाठी स्थावर मालमत्तेमधून ₹१,००० कोटी उभारण्याची अट केंद्र सरकारने घातली होती. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नरिमन पॉईंट येथील प्लॉट क्र. १९८७ व १९८८ एमएमआरसीला दिले होते.
मुंबईः कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्यात नरिमन पॉईंट येथील भूखंड विक्री करार पूर्ण झाला आहे.