मोठी बातमी : ...म्हणून सुशांत होता प्रचंड तणावात ? तीन दिवसांपूर्वीच नोकरांना म्हणाला....

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 18 June 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी होती. आता त्याच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपसृष्टीत विविध चर्चांना उधाण आलेले आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी होती. आता त्याच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपसृष्टीत विविध चर्चांना उधाण आलेले आहे. त्याने आत्महत्या व्यावसायिक स्पर्धेतून केली की व्यक्तिगत कारणामुळे याचा शोध पोलिस घेतीलच. 

पुढील आठवड्यापासून घुमणार लाईट, कॅमेरा अॅण्ड अॅक्शनचे सूर....

परंतु वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतला लवकरच एका वेबसीरीजच्या कॉन्ट्र्क्टचे 14 कोटी रुपये मिळणार होते. त्याबाबत त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियनशी त्याचे बोलणे झाले होते. मात्र नुकतेच तिने आत्महत्या केली. तिच्या निधनानंतर सुशांत प्रचंड तणावाखाली होता, असेही बोलले जात आहे.

सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी नजीकच्या व्यक्तीचा नोंदवला जबाब...​

दिशा सॅलियनचा 8 जून रोजी मृत्यू झाला. तिने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दिशा सॅलियन आणि सुशांत यांचे मार्च महिन्यात व्हॉटस अॅपवर दोनदा बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांचे काही बोलणे झाले नाही. एका वेबसीरीजचे कॉट्रॅक्ट होते. पण ते नेमके काय किंवा कोणते प्रोजेक्ट होते ते समजू शकलेले नाही. 

ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा? शिक्षण विभागाच्याच सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती....

दरम्यान, रविवारी(ता.14) सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच सुशांतने आपल्या सर्व स्टाफ आणि नोकरांचे पगार दिले होते. त्यावेळी त्याने नोकरांना असे म्हटले की, हा तुमचा पगार घ्या, यापुढे कदाचित तुम्हाला पगार देणे मला जमेल की नाही माहिती नाही, अशी माहिती एका मॅनेजरने पोलिसांना दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big news behind the sushant singh rajput depression