
मुंबई, ता. ११ : अंधेरी पश्चिम- दहिसर- गुंदवलीदरम्यान मेट्रो-२ अ आणि ७ मार्गावर नियमित वेगाने संचलन करण्यासाठीचे सुरक्षा प्रमाणपत्र नवी दिल्लीतील रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी (सीसीआरएस) दिले आहे.
त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या मेट्रो आता ताशी ८० किलोमीटर वेगाने चालवण्यात येणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
मेट्रो २ ‘अ’ अंधेरी डीएननगर ते दहिसर आणि अंधेरी पूर्व (गुंदवली) ते दहिसर या दोन्ही मार्गिका दहिसर येथे एकत्र येत असल्याने अंधेरी पश्चिम ते गुंदवली या मार्गावर सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत २५७ मेट्रो फेऱ्या चालवल्या जातात.