

Mumbai Metro Expansion: 92 km of New Lines to Transform Suburban Connectivity
esakal
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी वर्षभरात सुमारे ९२ किलोमीटर लांबीच्या नवीन चार मेट्रो मार्गिकांच्या कामाला वेगाने सुरुवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि उपनगरांमधील दळणवळण सुधारेल, असे अपेक्षित आहे.