esakal | तब्बल ७ महिन्यांनंतर मुंबई मेट्रो सुरु, नियमांचं पालन करणं बंधनकारक
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल ७ महिन्यांनंतर मुंबई मेट्रो सुरु, नियमांचं पालन करणं बंधनकारक

 कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा आजपासून सुरु झाली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आलेत. आजपासून मुंबई मेट्रो सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळातच धावेल.

तब्बल ७ महिन्यांनंतर मुंबई मेट्रो सुरु, नियमांचं पालन करणं बंधनकारक

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा आजपासून सुरु झाली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आलेत. आजपासून मुंबई मेट्रो सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळातच धावेल. आजपासून दररोज मेट्रोच्या 200 फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीत 300 जण प्रवास करु शकणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या मेट्रोच्या 50 टक्केच फेऱ्या सुरु करण्यात आल्यात. 

दरम्यान गरज भासल्यास मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये भविष्यात वाढ केली जाईल, असं मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. एका स्थानकावर मेट्रो थांबण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. यापूर्वी मेट्रो एका स्थानकावर 15 ते 20 सेकंद थांबत असे. आता मेट्रो 30 ते 60 सेकंदांपर्यंत स्थानकात थांबेल.

प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक दोन तासानंतर मेट्रोच्या स्थानकांवरील सर्व टचपॉईंटस सॅनिटाईझ केले जाणार आहेत. तर मेट्रोच्या प्रत्येक फेरीनंतर ट्रेनही सॅनिटाईझ होणार आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक केलं आहे. मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग होईल. तर ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. 

स्थानकात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर गरजेचं आहे.  संसर्ग टाळण्यासाठी दर दोन तासांनी स्थानकांवरील प्रवाशांशी संपर्क येणारी सर्व ठिकाणं निर्जंतुक केली जातील. तसेच प्रत्येक फेरीनंतर मेट्रोच्या डब्यांचेही निर्जंतुकीकरण केले जाणारेय. 

अधिक वाचाः  सावधान मुंबईकर! बेदरकार वाहनांमुळे पादचाऱ्यांना धोका; शहरात 39 ब्लॅक स्पॉट

मेट्रोमधून प्रवास करताना प्रवाशांना करोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असेल. प्रवास सुरू करण्यापूर्वी अस्वस्थ वाटत असल्यास किंवा आवश्यकता नसल्यास मेट्रोने प्रवास करू नये. तसेच ६५ वर्षांवरील आणि १० वर्षांखालील प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

मेट्रोच्या तिकिटासाठी यापूर्वी प्लास्टिक टोकन दिले जात होते. मात्र मानवी संपर्क टाळण्यासाठी ही पद्धत बंद करून कागदी तिकीट आणि मोबाइल तिकिटाचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.

Mumbai Metro started after 7 months it is mandatory follow the rules

loading image
go to top