आरे साईटवर मोठ्या हालचाली, मुंबई मेट्रो ३ कारशेड साईट बंद करून आवारावर सुरु

आरे साईटवर मोठ्या हालचाली, मुंबई मेट्रो ३ कारशेड साईट बंद करून आवारावर सुरु

मुमबी : मेट्रो ३ चं कारशेड आरे कॉलनीमधून हलवण्याचे सरकारकडून स्पष्ट संकेत आल्यानंतर आता या कन्स्ट्रक्शन साईटवर मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळतायत. या कन्स्ट्रक्शन साईटवरून आता कंत्राटदाराने आपली साधनसामुग्री हलवण्यास सुरवात केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच MMRC चे प्रोजेक्ट डायरेक्टर एस के गुप्ता यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. गुप्ता म्हणालेत की, "सध्या मुंबई मेट्रो ३ च्या कारशेडचं काम पूर्णतः बंद आहे. इथे साईट बंद करायचं काम सुरु आहे. या ठिकाणचं आधीचं बांधकाम आणि केलेली मोडतोड साफ केली जातेय. या साईटवरील खड्डे देखील बुजवले जातायत, जेणे करून ही साईट अधिक सुरक्षित होईल.  

गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडसाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी समिती नेमली. तेंव्हापासून मुंबई मेट्रो ३ च्या आरेतील 33 हेक्टरवरील कारशेडच्या कामावर 'स्टे' आला होता. या जागेवर नजर ठेवणाऱ्या आरे संवर्धन समूहाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, मेट्रो रॅम्पच्या बांधकामासाठीचं कामकाज मागील आठवड्यापर्यंत सुरू होतं. जेंव्हा एखादी भूमिगत मेट्रो अंधेरी (Seepz) पर्यंत येते त्यावेळी ती जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ओलांडून आरेतील ३३ हेक्टरवरील कारशेडमध्ये प्रवेश करू शकेल असं याचं डिझाईन आहे.

४५० कोटींचा खरंच आणि आरे सध्या प्रकल्पाबाबत आढावा घेणं सुरु 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच MMRC चे प्रोजेक्ट डायरेक्टर एस के गुप्ता म्हणालेत की डिसेंबरमध्ये जेंव्हा मुंबई मेट्रो ३ कारशेड कामावर 'स्टे' आला तोवर तिथे मोठ्या प्रमाणात काम सुरु होतं. आता सध्या तिथे कोणतेही नवीन काम केलं जात नाहीये. आता आम्ही त्या साईटवरील सर्व साहित्य काढून टाकायला सुरवात केलेली आहे. काम थांबलं आहे, मात्र कंत्राटदाराने आणलेली बरीच साधनसामग्री साईटवर आहे. आता ही साधनसामुग्री दुसऱ्या कन्स्ट्रक्शन साईटवर हलवण्यात येणार आहे. जेंव्हा मेट्रो ३ कारशेडचं काम सुरु झालं तेंव्हा त्याठिकाणी १५० कामगार काम करत होते. सध्या या साईटवर केवळ ३० कामगार आहेत. दरम्यान आतापर्यंत आरेतील मुंबई मेट्रो  ३ च्या कारशेडसाठी ४५० कोटींचा खर्च आल्याची देखील माहिती मिळतेय. 

सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील ६०० एकर जागा ही संरक्षित जंगलासाठी आरक्षित ठेवण्याची घोषणा केली. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधण्यास  MMRC म्हणजेच मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनला सूचित केलंय. यासाठी २ जागांवर विचार केला जात असल्याचं समजतंय. यामध्ये कांजूरमार्गवरील ४१ हेक्टरची जागा देखील आहे जिचा वापर मेट्रो सहाच्या कारशेडसाठी केला जाऊ शकतो. याशिवाय गोरेगाव पश्चिमेतील 'पहाडी' या ८९ हेक्टरवरील जागेचा देखील विचार केला जातोय. 

mumbai metro three aarey car shed site being cleared and closed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com