esakal | तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की...
sakal

बोलून बातमी शोधा

तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की...

तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मात्र काळा आला होता पण वेळ नव्हती. अशीच काहीसी परिस्थिती या अपघातात घडली आहे.

तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की...

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मात्र काळा आला होता पण वेळ नव्हती. अशीच काहीसी परिस्थिती या अपघातात घडली आहे. हा चिमुकला रस्त्यावर खेळत होता. त्याचवेळी कारनं त्याला चिरडलं. समोरुन कार येतेय बघून हा मुलगा घाबरुन आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पण कार चालकानं गाडी थांबण्याचं सोडून त्याच्या अंगावर नेली. पण सुदैवानं या अपघातात चिमुकल्याचा जीव वाचला आहे. त्यामुळे त्याचं नशीब बलवत्तर होतं, असंच म्हणावं लागेल. 

पश्चिम उपनगर मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी परिसरात ही घटना घडली आहे. म्हाडा कॉलनी येथे एक तीन वर्षांचा चिमुकला रस्त्यावर खेळत होता. त्यावेळी ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

अधिक वाचाः म्हाडामार्फत ठाण्यातील 567 सदनिका पोलिसांना मिळणार

नेमकं काय घडलं?

तीन वर्षांच्या चिमुकला रस्त्यावर खेळत होता. त्यावेळी त्याच्या मागून अचानक एक कार आली. कार आपल्या जवळ येताच त्याला दिसताच तो घाबरला आणि आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र भरधाव आलेल्या कारचे दोन्ही टायर त्याच्या अंगावरुन गेले. सुदैवानं या घटनेत चिमुकला जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचले.

हेही वाचाः  कोरोनाच्या संकट काळात बेस्ट बसनं प्रवास करताय, मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी

गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेजच्या आधारे कार चालकाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Malad Malvani 3 year old boy hit by car While playing on road

loading image