
मुंबईतील तापमानात वाढ झाली असून थंडी गुल झाल्याचे दिसते. हवेचा वेग मंदावल्याने उष्मा वाढला आहे.
मुंबई: मुंबईतील तापमानात वाढ झाली असून थंडी गुल झाल्याचे दिसते. हवेचा वेग मंदावल्याने उष्मा वाढला आहे. पुढील काही दिवस यात बदल होणार नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण हटायला सुरुवात झाली आहे. परिणामी मुंबईतील तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी काळात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील गारठा वाढला होता. मात्र कालपासून कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. मुंबईत काल कमाल तापमान 34 अंशापेक्षा अधिक नोंदवले गेले. आज ही मुंबईतील कमाल तापमान 32.25 अंशाच्या आसपास आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईसह विदर्भात देखील कमाल तापमान 35 अंश सेल्सियस वर पोहोचले आहे. तर इतर जिल्ह्यांत देखील 30 ते 32 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. यात फारसा बदल अपेक्षित नसून लोकांना पुढील काही दिवस उन्हाची काहिली सहन करावी लागणार आहे.
किमान तापमानात फारसा बदल जाणवत नाही. मात्र कमाल तापमानात मोठा बदल दिसत असून गेल्या पाच दिवसांपासून कमाल तापमान 28/29 वरून 33/34 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. ढगाळ वातावरण दूर होऊन लख्ख सूर्याचे दर्शन झाल्याने कडक ऊन पडले आहे. त्याशिवाय हवेचा वेग ही मंदावल्याने तापमानात वाढ झाली आहे. काही दिवस यात फारसा बदल अपेक्षित नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक के एस होसाळीकर यांनी सांगितले.
हेही वाचा- TRP Case: विशेष तपास पथकाकडून 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल
------------------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)