esakal | मुंबई : ‘मोदी एक्स्प्रेस’ सिंधुदुर्गकडे रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

modi express

मुंबई : ‘मोदी एक्स्प्रेस’ सिंधुदुर्गकडे रवाना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ आजपासून धावू लागली. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा घोष करीत चाकरमान्यांनी प्रवास सुरू केला. गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार नितेश राणे यांनी दादर स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. एकूण १८०० चाकरमान्यांना घेऊन गाडी सावंतवाडीला रवाना झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून कोकणवासीयांसाठी २२५ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणात विशेषतः सिंधुदुर्गवासीयांसाठी धावणार आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. यंदा नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे.

हेही वाचा: मुंबई : मास्क बंधनकारक तरीही रोज २२५ जणांवर कारवाई

त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडण्यात आली, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली. गाडी दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे.

गाडीची वैशिष्ट्ये

‘मोदी एक्स्प्रेस’ सिंधुदुर्गातील चाकरमान्यांना गावी घेऊन जाणार

एकूण १८०० जणांचा प्रवास

प्रवास विनामूल्य. एक वेळचे जेवण

loading image
go to top