Mumbai Monsoon Rain : मुंबईत मान्सूनची दमदार एंट्री ! उकाड्यापासून दिलासा, पुढील ४८ तासांसाठी 'यलो अलर्ट' जारी

IMD Yellow Alert : हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देत 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला. 24 ते 27 जूनदरम्यान कोकण व राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
Mumbai Monsoon Rain

Heavy monsoon showers lash Mumbai city

esakal

Updated on

Mumbai Rain: मान्सूनने प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा प्रगती केली आहे. काल कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पर्यंत धडकलेला मान्सून मुंबईतही दाखल झाला आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मंगळवारी सकाळी दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com