esakal | ...तर खुशी आणि उर्मीला वाचली असती, ठाकूर कुटुंबीयांवर काळाचा घाला!
sakal

बोलून बातमी शोधा

Subhash Thakur

...तर खुशी आणि उर्मिला वाचली असती, ठाकूर कुटुंबियांवर काळाचा घाला!

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : चेंबूर वाशीनाका (Chembur) येथे गेली 15 वर्षे राहणाऱ्या सुभाष ठाकूर (Subhash Thakur) यांच्या घरावर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. दरड कोसळण्याच्या (Land Collapse) घटनेत सुभाष ठाकूर यांनी आपली 32 वर्षीय पत्नी उर्मिला ठाकूर आणि फक्त 2 वर्षांच्या खुशीला कायमचे गमावले आहे. दादरमध्ये टाॅमेटो विकणारे सुभाष ठाकूर हे रोजप्रमाणे जेऊन रात्री 1 च्या सुमारास दादरला (Dadar) पोहोचले. दादरला पोहोचल्यावर सुभाष यांना 1.30 वाजता घरातुन काॅल आला. त्यानंतर, पावसाचा जोर कायम असल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. त्याच पाण्यातून वाट काढत सुभाष चालत चालत सायन (Sion) पर्यंत पोहोचले. ( Mumbai Monsoon Tragedy of Subhash Thakur Family wife and daughters death-nss91)

तिथून कुर्ल्याच्या कमाणीपर्यंत एका बाईकस्वाराकडून लिफ्ट घेत पोहोचले आणि तिथून त्यांनी रिक्षा करत चेंबूरचे भारतनगर गाठले. पण, तोपर्यंत खुशी आणि तिची आई उर्मिला या दोघी ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. उर्मिला आणि सुभाष यांच्यात वाद झाल्याने उर्मिला तिच्या माहेरी राहायला गेली होती. तिच्यासोबत खुशीही गेली होती. आणि सुभाष हे तिथल्या म्हाडाच्या इमारतीत राहतात. पण, जर उर्मिला आणि खुशी माझ्यासोबत राहिल्या असत्या तर कदाचित वाचल्या असत्या अशी प्रतिक्रिया सुभाष ठाकूर यांनी दिली आहे. उर्मिला या त्यांच्या आई 54 वर्षीय जिजाबाई तिवारी यांच्याकडे राहत होत्या. त्यांचा ही या दुर्घटनेत मृत्यु झाला आहे.

हेही वाचा: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रूग्णालयात दाखल

माल डिलिव्हरी करायला गेलो अन वाचलो

या घटनेन उर्मिलाचा भाऊ लल्लन तिवारी आणि वहिणी अनुजा तिवारी हे दोघे थोडक्यात बचावले. लल्लन यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ते गेल्या अनेक वर्षांपासून आई,बहिण आणि भावोजी यांच्यासोबत राहतात. लल्लन पेशाने ड्रायवर आहेत आणि घटनेदरम्यान ते आणि त्यांची पत्नी दोघेही घरी नव्हते. लल्लन सामानाची  डिलीवरी पोहोचवण्यासाठी बाहेर गेले होते. आणि त्यांची पत्नी अनुजा तिवारी कल्याणमध्ये त्यांच्या आईकडे गेली होती. या कारणामुळे ते दोघेही बचावले आहेत. पण, आपली बहिण उर्मिला, आई जिजाबाई आणि भाची खुशी यांना गमावले आहे. या पावसाने त्यांना कधीही न विसरली जाणारी जखम दिली आहे. तर, लल्लन यांच्या पत्नीने सांगितले की, 2005 मध्येही दरड कोसळली होती. तेव्हाही नणंद उर्मिला आणि सासू जिजाबाई यांना मुका मार लागला होता. पण, आता त्या कायमच्या निघून गेल्या आहेत.

loading image