esakal | मुंबईत मुसळधार पावसाचा जोर राहणार कायम
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai heavy rainfall

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर राहणार कायम

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत (Mumbai) मुसळधार पाऊस (heavy rainfall) झाला असून गेल्या 24 तासात 61.66 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (Monsoon update) व्यक्त केली आहे. मुंबईसाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट (Mumbai on yellow Alert) देण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर

मुंबईत पावसाचे दमदार पुनरागमन झाले.आज दिवसभर पावसाचा जोर वाढलेला दिसला. गेल्या 24 तासात मुंबईत शहर 82 मिमी,पूर्व उपनगर 47 मिमी तर पश्चिम उपनगर 56 मिमी पावसाची नोंद झाली. संपूर्ण मुंबई शहरात 61.66 मिमी पाऊस कोसळला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले.येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली. तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता ही आहे.

परीणामी पश्चिम किनारपट्टीवर पुढचे 3 ते 4 दिवस जोरदार वारे असतील. त्यामुळे मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता ही आहे.मुंबईसह संपूर्ण कोकण किनार पट्टीवर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पालघर,ठाणे,रायगड मध्ये ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्ग मध्ये उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

loading image
go to top