काळजी घ्या, गेल्या अडीच महिन्यात मुंबईत कोरोनानं घेतले 'इतके' बळी

काळजी घ्या, गेल्या अडीच महिन्यात मुंबईत कोरोनानं घेतले 'इतके' बळी

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबई शहराला या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत गेल्या पाच महिन्यापासून तळ ठोकून असलेला कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे. मात्र तसं असलं तरी कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. राज्यभर अजूनही कोरोना संकट आहे. राज्यात गेल्या अडीच महिन्यात 5 लाख 28 हजार नविन रूग्णांची भर पडली आहे. तर 18 हजाराहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी मृतांचा आकडा  7133 आहे. तर ठाण्यात 3329 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

राज्यात जून,जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास 18 हजाराच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले. यापैकी मे महिन्याअखेर 2200 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र जून महिन्यात यात 5300 जणांच्या मृत्यूची भर पडत ही संख्या जून अखेर 7 हजार 855 वर पोहचली. 1 जुलैला 8053 वर असलेली मृतकांची संख्या 31 जुलै अखेर 14 हजार 999 वर तर 1 ऑगस्टला ही संख्या 15 हजार 316 वर पोहोचली तर 1 ऑगस्ट दरम्यान ही संख्या 20 हजार 37 वर पोहोचली. या तीन महिन्याची सरासरी पाहिल्यास जून महिन्यात 5 हजार 493, जुलै महिन्यात 9 हजार 506 आणि 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत तब्बल 10 हजार 243 सरासरी रूग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील परिस्थिती काहीशी नियंत्रात असल्याचे दिसते. मात्र  राज्यात रविवारी 8837 रूग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण 4 लाख 17 हजार 123 रूग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के एवढे आहे. आज 1,111 इतक्या नविन रूग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 58 हजार 395 रूग्णांवर उपचार सुरू आहेत मात्र राज्यात आतापर्यंत 20 हजार 37 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. 

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 31 लाख 62 हजार 740 नमुन्यांपैकी 5 लाख 95 हजार 865 नमूने म्हणजेच 18.84 टक्के पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 10 लाख 53 हजार 897 लोकं हो क्वारांटाईन आहेत.सध्या 38 हजार 203 लोकं संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 288 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृतांची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.36 टक्के एवढा आहे. मुंबई नंतर ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या परिसरांत रूग्ण आणि मृत्यू वाढताना दिसत आहेत.                      

  • मुंबई: बाधित रुग्ण- (१,२८,७२६) बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६८), मृत्यू- (७१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७,८२५)
  • ठाणे: बाधित रुग्ण- (१,१३,९४४), बरे झालेले रुग्ण- (९०,३२६), मृत्यू (३३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,२८८)
  • पालघर: बाधित रुग्ण- (२१,२२६), बरे झालेले रुग्ण- (१४,२१०), मृत्यू- (५००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५१६)
  • रायगड: बाधित रुग्ण- (२३,४०२), बरे झालेले रुग्ण-(१७,६४०), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८२)

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai More than 7 thousand corona deaths in just two and a half months

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com