plazma testing.
plazma testing.

Mumbai: मुंबईत सहा हजारांहून अधिक प्लाझ्मा वाया, रक्ताच्या तुलनेत दररोज एक तृतीयांश वापर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : रक्तदानानंतर रक्तातील काही प्रमुख घटक वेगळे केले जातात. त्यातील प्लाझा हा ठराविक रुग्णांना दान करावा लागतो. मात्र, मुंबईतील रक्तपेढ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या ९ वर्षांत सहा हजारांहून अधिक प्लाझ्मा युनिट रुग्णांसाठी वापरता आले नाहीत. त्याची कालबाह्यता हे त्यामागचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. कालबाह्यतेमुळे प्लाझ्माच निरुपयोगी झाला. कालबाह्य झालेल्या प्लाझ्मामध्ये गोठलेले आणि द्रव समाविष्ट आहे.

रक्ताच्या तुलनेत या प्लाझ्माचा कालबाह्य कालावधी सुमारे एक वर्ष आहे. रक्ताच्या तुलनेत मुंबईत प्लाझ्माची रोजची मागणी सुमारे एक तृतीयांश आहे. दरम्यान, राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) आता आरटीआयद्वारे प्लाझ्माच्या सहा हजार युनिट्सची मुदत संपल्याची माहिती दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या १० वर्षांत प्लाझ्माची नासाडी किंवा कालबाह्यता याबाबत माहिती मागवली होती. याला उत्तर देताना एसबीटीसीने सांगितले की, सन २०१४ ते २०२२ पर्यंत ६,१०२ युनिट प्लाझ्मा कालबाह्य होऊन रक्तपेढ्यांमध्ये वाया गेले आहेत. त्यात ३,७७१ गोठलेले आणि २,३३१ द्रव प्लाझ्मा आहेत.

दररोज ३०० युनिटची मागणी
रक्तपेढीनुसार, मुंबईत साधारणपणे ९५० रक्त युनिटची रोजची मागणी असते. त्या तुलनेत सुमारे ३०० प्लाझ्मा युनिटची मागणी आहे.

काय आहे प्‍लाझ्मा?
प्लाझ्मा केवळ संपूर्ण रक्तापासून वेगळे केले जाते. प्लाझ्मा हा आपल्या रक्ताचा द्रव भाग आहे. प्लाझ्मा शरीरातील विविध पेशींमध्ये प्रथिने, हार्मोन्स आणि पोषक घटक वाहून नेण्यास मदत करतो. क्लोटिंग घटक जे कट झाल्यावर रक्तस्राव थांबविण्यास मदत करतात. पोटॅशियम आणि सोडियमसारखे पोषक तत्त्व जे पेशी कार्य करण्यास मदत करतात. याशिवाय प्लाझ्मा सामान्य रक्तदाब आणि रक्ताचे योग्य प्रमाण राखते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com