चॅलेंजिंग ऑपरेशन, नौदलाच्या वीरांनी सांगितला समुद्रातील थरार

मोठ्या लाटांमुळे मृतदेह बाहेर काढणं देखील कठीण बनलं होतं, असं मरीन कमांडो अमित यांनी सांगितलं.
भारतीय नौदल
भारतीय नौदलफाईल फोटो

मुंबई: मागच्या आठवड्यात आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळाच्या (taukte cyclone) तडाख्यात सापडून P 305 हे बार्ज अरबी समुद्रात (arabain sea) बुडालं. या बार्जवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याची अत्यंत खडतर अशी मोहिम भारतीय नौदलाच्या (indian navy) नौसैनिकांनी पार पडली. खवळलेल्या समुद्रात या समुद्रवीरांनी अचाट कामगिरी करुन दाखवली. त्याच नैसैनिकांनी या बचाव मोहिमेचा थरार कथन केला आहे. (Mumbai Most challenging experience say heroes of Navys rescue operation of p 305)

"आमच्या आयुष्यातील ही सर्वात आव्हानात्मक बचाव मोहीम होती. ज्यांना आम्ही वाचवतोय, ते घाबरणार नाहीत हे आम्हाला सुनिश्चित करायचे होते. कारण ते घाबरले तर बचाव मोहिम आणखी अडचणीची ठरली असती. तीन कर्मचारी घाबरलेले होते, भेदरले होते. त्या स्थितीत त्यांची जाळ्यावरची पकड सुटली व ते पाण्यात पडले. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी आम्ही पाण्यात उडी मारली. त्यांना जाळीजवळ आणलं, असं अनिल सिंह यांनी सांगितले. नौदलात पाणबुडे असलेले अनिल सिंह या बचाव मोहिमेत सहभागी झाले होते.

भारतीय नौदल
नात्याला कलंक, पुतण्यानेच काकीवर केला बलात्कार

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून हे P 305 बार्ज भरकटलं व समुद्रात बुडालं. त्यानंतर १७ मे पासून २३ मे पर्यंत बचाव मोहिम सुरु होती. "खवळलेल्या समुद्रात याआधी सुद्धा मी पोहलो आहे. पण असा थरारक अनुभव कधीच घेतला नव्हता. मोठ्या लाटांमुळे मृतदेह बाहेर काढणे देखील कठीण बनले होते" असे मरीन कमांडो अमित यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

भारतीय नौदल
लसीकरण झालेल्या ६० वर्षांपुढील मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी

कीर्तीसागर बारल या पाणबुड्याने तब्बल १५ फूट उंचीवरुन खवळलेल्या समुद्रात उडी मारली. बारल यांच्या टीमने पाच कर्मचाऱ्यांना वाचवले व १६ मृतदेह शोधून काढले. P 305 दुर्घटनेनंतर बचाव मोहिमेत सहभागी झालेस्या सर्वच नौसैनिकांसाठी हा थरारक अनुभव होता. खवळलेल्या निसर्गाबरोबर त्यांची लढाई होती. तौक्त चक्रीवादळामुळे दोन दिवस समुद्राला उधाण आले होते. बार्ज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलाच्या युद्धनौका तडक अरबी समुद्राच्या दिशेने निघाल्या. स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता सर्वसामान्यांचे जीव वाचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com