मुंबई : मानखुर्दमध्ये शिंदे गटाची पहिली शाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Rahul Shewale started First branch of eknath Shinde Group

मुंबई : मानखुर्दमध्ये शिंदे गटाची पहिली शाखा

मुंबई : शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. शिंदे गटाने दादर येथेच प्रति शिवसेना भवन उभारण्याची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाची पहिली शाखा मुंबईतील मानखुर्द येथे सुरू करण्यात आली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी ही शाखा सुरू केली आहे. प्रति शिवसेना भवन उभारण्यासाठी शिंदे गटाकडून दादरमध्ये जागा निश्चित करण्यात आल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी जाहीर केल्यानंतर शेवाळे यांनी थेट शाखाच सुरु करून त्या दिशेने आता पहिले पाऊल टाकले आहे.

शिंदे गटाकडून सुरू केलेल्या या शाखेच्या बाहेर उभारलेल्या फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांची छायाचित्रे आहेत. मात्र, यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे नसल्याने चर्चा सुरु झाली असून त्यावरुन स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाची ही पहिली शाखा मानखुर्दमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये अशाच प्रकारची शाखा सुरू करण्यात येणार आहे.

-राहुल शेवाळे, खासदार, शिंदे गट

Web Title: Mumbai Mp Rahul Shewale Started First Branch Of Eknath Shinde Group In Mankhurd

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..