
Mumbai: खासदार संजय राऊतांची कथित सुपारी घेणारा;राजा ठाकूर कोण आहे?
मुंबई- खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त,
ठाणे पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांनी श्रीकांत शिदेंवर केलेले आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया राजा ठाकूर यांनी दिली आहे. तसेच बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती राजा ठाकूरनी दिली आहे.
संजय राऊतांच्या या आरोपानंतर ठाण्यातील गुंड राजा ठाकूर नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वादग्रस्त राजा ठाकूर
राजा ठाकूर हा ठाण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्या आणि हत्येता प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.जानेवारी 2011 मध्ये ठाणे-बेलापूर रस्त्यावर कळवा येथील विटावा पुलाखाली दीपक पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी रविचंद ठाकूर उर्फ राजा ठाकूर होता. या प्रकरणी राजा ठाकूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण एप्रिल 2019 मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजा ठाकूर पुन्हा पोलिसांसमोर हजर न होता, तो फरार झाला.
यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने येऊरच्या साई ढाबा येथे सापळा रचून राजा ठाकूरला बेड्या ठोकल्या.
त्यानंतर पुन्हा जामिनावर सुटलेल्या ठाकूर याने राजकीय नेत्यांकडून राजाश्रय मिळवला. या
राजा ठाकूरची प्रतिक्रिया
"संजय राऊत यांनी केलेले आरोप हे निराधार आहेत. माझा आणि श्रीकांत शिंदे यांचा काही संबंध नाही . माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे आणि यावर मी कायदेशीर मार्गाने कारवाई करणार आहे"