Mumbai Corporation Election कार्यकर्त्यांची चांदी, प्रचारात मेजवानी
esakal
- मयूर फडके
मुंबई : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचार मोहिमांसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्याच कार्यकर्त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत, यासाठी राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांनी पुढाकार घेतला असून नाश्त्याला वडापाव, समोसा, चहा तर दुपारी जेवणाची थाळी अथवा बिर्याणीची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत आहे.