Mumbai : अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे,त्याशिवाय अनधिकृत बांधकाम होणार नाही ; आ. पाटील

मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका प्रशासनावर साधला निशाणा
MLA Raju Patil
MLA Raju Patilsakal

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकाम आणि त्यात झालेली शासनाची फसवणूक हा प्रश्न सध्या गाजत आहे. फसवणूक प्रकरणात पालिका प्रशासनातील अधिकारी, अभियंते यांचाही समावेश असून सध्या विशेष तपास पथक त्याचा तपास करत आहे.

एकेका अधिकाऱ्याचे दोन तीन बांधकामे सुरू आहेत. याबाबत नाव आणि माहिती मी ईडी आणि आयकर विभागाला दिली असल्याचे तक्रारदार आणि वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले. याविषयी मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादा शिवाय अनधिकृत बांधकाम होऊ शकत नाही. एक साधी झोपडी उभी राहिली तरी कार्यवाही होते. मग टोलेजंग इमारती उभ्या राहतात कशा ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पाटील यांच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजोरा दिला.

केडीएमसीची बनावट कागदपत्रे तयार करत त्याआधारे रेराची नोंदणी प्रमाणपत्र मिळवत शासनाची व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 65 विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा विशेष तपास पथक, ईडी यांच्याकडून विशेष तपास सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस येताच

महारेराने 52 विकासकांची नोंदणी निलंबित केली होती. या विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. इमारत बांधकामाची कागदपत्रे व रेरा नोंदणी प्रमाणपत्रे विकासकांना रेराकडे दाखल करण्यास सांगण्यात आले होते. यातील 15 बांधकामांची रेरा नोंदणी कायदेशीर प्रक्रीयेने रद्द देखील केली आहे. विशेष तपास पथकाने आत्तापर्यंत यात 10 जणांना अटक केली आहे त्यात 4 विकासकांचा समावेश आहे. तसेच विकासकांची बँक खाती देखील गोठविण्यात आली आहेत. तक्रारदार वास्तुविशारद संदीप पाटील यांनी नुकतीच अशी माहिती दिली आहे की पालिका प्रशासनातील सर्वेक्षक व नगर रचना विभाग यास जबाबदार असून त्यातील अधिकाऱ्यांची नावे व माहिती मी तपास पथक व ईडी ला दिली आहे.

दरम्यान केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की अधिकाऱ्यांच्या आशीर्वादा शिवाय अनधिकृत बांधकाम होऊ शकत नाही. मी याबाबत या आधीही एसीबी पोलीस आयुक्तांना तक्रारी केल्या होत्या. एक साधी झोपडी उभी राहिली तरी तुम्ही काढायला जाता. मात्र, टोले जंग इमारती उभ्या कशा राहतात? 27 गावांत कोणतेही धोरण नव्हते. आरक्षणामुळे स्थानिकांना जागाच राहिली नव्हती. ज्या भूमिपुत्रांनी बांधकामे केली त्यांच्यावर केसेस झाल्या, बांधकामे तोडली. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान राजू पाटील यांनी मंगळवारी दुपारी केडीएमसी आयुक्तांसह अधिकारी यांची भेट घेतली. केडीएमसी क्षेत्रात भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत आयुक्त आणि अधिकारी यांच्याशी चर्चा केली. लवकरात लवकर या समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com