ठरल! मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्चला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai municipal corporation

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या ४ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल मांडणार आहेत.

Mumbai Municipal Budget : ठरल! महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्चला

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या ४ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल मांडणार आहेत. विशेष म्हणजे ३६ वर्षांनंतर प्रशासकांच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याआधी १९८४ साली द म सुखटणकर यांनी पालिकेचा अर्थसंकल्प मांडला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये पालिकेत शनिवारच्या दिवशी कामकाज बंद राहत होते. परंतु अनेक महिन्यानंतर अर्थसंकल्पामुळे पालिकेचे कामकाज सुरू राहणार आहे.

पालिकेने गेल्यावर्षीच्या म्हणजे २०२२-२३ साठीच्या अर्थसंकल्पात मूलभूत योजना आणि लोकोपयोगी कामांसाठी एकुण २२ हजार ६४६ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली होती. परंतु मंजूर निधीपैकी पालिकेत फक्त ३७ टक्के इतकाच निधी खर्च करण्यात आला. पालिकेने फक्त ८ हजार ३९८ कोटी रूपयांचा निधी खर्च केला आहे. तुलनेत २०२०-२१ मध्ये ४० टक्क्यांहून अधिक म्हणजे १० हजार ९०३ कोटी रूपयांचा निधी पालिकेकडून खर्च करण्यात आला होता.

यंदाच्या वर्षातील प्रकल्पांमध्ये विकास प्रकल्पाअंतर्गत आरोग्य, एसटीपी प्लांट, आश्रय योजना, घनकचरा व्यवस्थापन, विकास आराखडा यासारख्या विविध विभागाअंतर्गत या निधीचा वापर यंदा करण्यात आला आहे. या निधीचा वापर करण्यासाठी पालिकेकडे येत्या मार्च अखेरीपर्यंतचा कालावधी आहे. त्यामुळे आगामी कालावधीतही या निधीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.